बाणेर : प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण परिसरात परिवर्तनाच्या दिशेने एक सकारात्मक चित्र दिसून येत असून, जयेश मुरकुटे यांच्या प्रचारात माता-भगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होत आहेत. परिसरातील सर्व महिला भगिनींनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जयेश मुरकुटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा आणि भविष्यातील बदल यावर मतदारांशी संवाद साधला. महिलांचा हा सक्रिय सहभाग परिवर्तन अभियानाला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी एकत्र येत प्रचार पत्रकांचे वाटप केले आणि प्रचारात आपला ठसा उमटवला.
महिला भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, परिवर्तनासाठी महिलांची ताकद एकवटली जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराला मिळणारी ही भक्कम महिला साथ आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नवी वाट घडवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


























