डॉ. दिलीप मुरकुटे पाटील मित्र परिवारतर्फे स्नेहभोजन; उत्तर भारतीय महासंघाचा जाहीर पाठिंबा

बाणेर : डॉ. दिलीप मुरकुटे पाटील मित्र परिवार यांच्या वतीने उत्तर भारतीय व इतर नागरिकांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी उत्तर भारतीय महासंघाच्या वतीने डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर भारतीय बांधवांनी डॉ. मुरकुटे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच पुढील काळात आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला डॉक्टर दिलीप मुरकुटे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वर्मा, ओम बांगर, राजू शेडगे, रखमाजी पाडाळे, सुदाम मुरकुटे, बेलाल आलम, राजेश वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

स्नेहभोजनाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, एकात्मता आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दिलीप मुरकुटे पाटील मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

See also  अण्णासाहेव पाटील यांना महामंडळाकडून अभिवादन