परिहार चौकामध्ये अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करत टपरी दुकानांना सील

औंध : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने परिहार चौकामध्ये पालिकेच्या जागेमध्ये पोट भाडेकरू ठेवणाऱ्या टपरी चालकांनी विरोधात कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिक्रमण विभागाच्या वतीने भाडेकरू ठेवणाऱ्या दुकान मालकांवर कारवाई करत दुकानांना सील लावण्यात आले.
यावेळी शनिवारी दुपारच्या दरम्यान कामगार कामावर असताना ही कारवाई करण्यात आली. जेवणासाठी घरी गेलो असताना झालेली पालिकेची कारवाई ही जुजबी माहितीच्या आधारावर असल्याचे मत यावेळी काही दुकानदारांनी व्यक्त केले.
यावेळी क्षेत्रिय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

See also  कृषी उत्पन्न बाजार समितीने फिश व पोल्ट्री मार्केटच्या ठरावा विरोधात सर्वपक्षीय आंदोलन