श्री काळभैरवनाथ उत्सव व हनुमान जन्मोत्सव सुतारवाडी पाषाण संपन्न

पाषाण : श्री काळभैरवनाथ उत्सव व हनुमान जन्मोत्सव सुतारवाडी पाषाण येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव श्री काळभैवनाथाची पालखी भजनी मंडळ , ढोल , ताशा ,लेझीम खेळ व विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

यात्रेनिमित्त भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली होते. महादेव मंदिर ते भैरवनाथ मंदिरापर्यंत पालखी निघाली यावेळी समस्त सुतारवाडी गावातील ग्रामस्थ व गोविंद रणपिसे , शाम रणपिसे, बालम सुतार, दिलीप रणपिसे , हनुमंत खेडेकर विनोद खेडेकर, सचिन रणपिसे, अतुल रणपिसे गुरूजी रणपिसे, अमित रणपिसे, रोहित रणपिसे आणि कैलास रणपिसे तसेच गावातील लहान, तरूण, थोर, ज्येष्ठ लोकांनी व महिलांनी सहभाग घेतला.

See also  औंध येथील विनापरवाना रस्ता खोदाई करून विद्युत केबल टाकणाऱ्यांना तीन पट दंड करून फौजदारी गुन्हा दाखल करावा