आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटके विरोधात सीबीआयसमोर आप ची तीव्र निदर्शने पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

पुणे :आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांच्या अटकेचे पडसाद आज पुण्यात उमटले. आम आदमी पक्षातर्फे आज येरवडा येथील सीबीआय ऑफिस समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपचे केंद्रात असलेले सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर हेतू पुरस्सर गुन्हे नोंदवून हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर करत आहे असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय सिंग यांच्यावर 82 लाख रुपयांचा दारू नीती घोटाळ्यातील आरोप ठेवून काल संध्याकाळी 10 तासाच्या चौकशी नंतर त्यांना अटक केली गेली. याच विषयात गेल्या दिड वर्षां पासून अनेकदा ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांनी चौकशी करूनही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. तसेच काही महिन्यांपूर्वी संजय सिंग यांचे नाव चार्टशीट मध्ये घातले होते परंतु संजय सिंग यांनी या विरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा करताच, नजर चुकीने त्यांचे नाव चार्जशीट मध्ये आल्याची कबुली ईडीने दिली होती. संजय सिंग यांनी मोदी सरकारचे अदानी यांच्याबरोबर असलेल्या संबंधांवर तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर तीव्र आक्षेप राज्यसभेमध्ये वारंवार घेतले असल्याने त्यांना राज्यसभेतून बडतर्फ केले गेले आणि त्यानंतर आता त्यांना त्रास देण्यासाठीच त्यांच्यावर इडी ची कारवाई केली जात आहे. आम आदमी पक्षाच्या मुख्य फळीतील नेते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही गेल्या आठ महिन्यापासून दारू घोटाळ्याच्या केस मध्ये केंद्रातील भाजप सरकारने अडकून ठेवले आहे.

2024 च्या येणाऱ्या निवडणुकीपूर्वी विरोधकांवर ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांमार्फत कारवाई करून त्यांना कमजोर करायचे आणि 2024 मध्ये पुन्हा सत्ता हस्तगत करायची ही भाजपाची खेळी आहे. भाजपाने संविधानाचा अनादर करत लोकशाहीला गेल्या नऊ वर्षात काळीमा फासणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. एकीकडे देशाला हजारो कोटींना बुडवणारी उद्योजक देशाबाहेर पळाले असताना त्यांना कोणत्याही प्रकारे देशात परत आणण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत. तसेच महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना सत्तेत सामील करून घेतले आहे. भाजपाने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची भीती घेतली आहे आणि आपल्या विरोधात कोणीही उभे राहू नये याकरिता विरोधी पक्षातील नेत्यांवर आसूड बुद्धीने तपास यंत्रणा वापरून कारवाई केली जात असल्याचे आप चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.

केंद्रातील सरकार तपास यंत्रणेचा जर असाच गैरवापर करत राहिली तर भविष्यात या देशात लोकशाही टिकणार नाही आणि केवळ हुकूमशाही येईल ही भीती आता सर्वच विरोधी पक्षांना वाटत आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांचा आम आदमी पक्षातर्फे जाहीर निषेध केला जात आहे तसेच यापुढेही देशातील नागरिकांना जागे करण्यासाठी तीव्र आंदोलने पक्षातर्फे हाती घेतली जातील असे सांगण्यात आले.
या आंदोलनास आम आदमी पक्षातर्फे तर्फे सुदर्शन जगदाळे, मुकुंद किर्दत, किरण कांबळे, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, सुरेखा भोसले, ऋषिकेश मारणे, सतीश यादव, अनिल कोंढाळकर, ॲड.अमोल काळे, संजय कोने, तुकाराम शिंदे, सुनील भोसले, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, अंजना वांजळे, संगीता पवार, गजानन भोसले, विशेष निकाळजे, विलास चव्हाण, हरुण मुलानी, शमीम मुलानी, अभिजीत गायकवाड, अक्षय शिंदे, अमीर तांबोळी, अमोल मोरे महेश सूर्यवंशी, शेखर ढगे, कुणाल धनवडे, तानाजी शेरखाने, सुनिता शेरखाने, फँबियन सॅमसंन, ॲड. रशिदा सिद्दिकी, ॲड. हर्षल भोसले, सुशील बोबडे, अविनाश भाकरे, प्रीती निकाळजे, मिलिंद ओव्हाळ, मयूर कांबळे, महेश सूर्यवंशी, सारिका भंडारी, बाळू भंडारी, महेश कड, संजय कोने, अमित म्हस्के, कुणाल धनवडे, पद्मजा पलसे, निलेश वांजळे, सौरभ, ॲड.स्वप्निल गांगुर्डे, अनिश वर्गीस, मंजुनाथ मानुरे, निखिल खंदारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  वसुंधरा अभियान रक्तदान शिबिरामध्ये 166 जणांचे रक्तदान