पुणे : पाषाण–सुतारवाडी परिसरातील ज्येष्ठ नेते मा. श्री. आबासाहेब सुतार तसेच युवा नेते व माजी स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम करत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्र. ९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे बळ मिळाले असून स्थानिक राजकारणात महत्त्वाची घडामोड घडल्याचे चित्र आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग क्रमांक ९ मधील अधिकृत उमेदवार अमोल बालवाडकर, गायत्री कोकाटे–मेढे, पार्वती निम्हण यांची उपस्थिती होती. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या आबासाहेब सुतार व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शिवम सुतार यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.























