कात्रज : भारती विद्यापीठाचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज धनकवडी पुणे 43 येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य विजयकुमार अडसूळ, शिक्षक शंकर आव्हाड, स्मिता जाधव तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली. विद्यालयातील शिक्षिका प्रतिभा पाटील, शिक्षक अजय लोमटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कवितेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्ण वालकोळी यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी उपस्थित होते.






















