विकासासोबत रोजगारनिर्मितीवर भर जयेश मुरकुटे यांचा सर्वसमावेशक अजेंडा

बाणेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश संजय मुरकुटे यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासोबत रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणारा स्पष्ट अजेंडा जाहीर केला आहे. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणारी ही भूमिका मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.नवीन विकासकामे, पाणीपुरवठा योजना, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन यामधून स्थानिक कामगारांना प्राधान्य देऊन रोजगारनिर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सफाई कर्मचारी, ड्रायव्हर, देखभाल कर्मचारी यांच्यासाठी नियमित आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

तरुण, महिला आणि बेरोजगार नागरिकांसाठी कौशल्य प्रशिक्षण (Skill Development) कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, लघुउद्योगांना प्रोत्साहन, तसेच स्टार्टअप व छोटे व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा आराखडा त्यांच्या अजेंड्यात समाविष्ट आहे. शासनाच्या विविध योजना, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.या सर्व मुद्द्यांमुळे “फक्त विकास नाही, तर रोजगार देणारा उमेदवार” अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, तरुण वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. सध्याचे जनमत पाहता, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या सर्व मुद्द्यांमुळे “फक्त विकास नाही, तर रोजगार देणारा उमेदवार” अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, तरुण वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. सध्याचे जनमत पाहता, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

See also  महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे