राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बाणेर येथे वाहतूक पोलिसांची आरोग्य तपासणी

बाणेर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व सुखद व्हावा यासाठी स्वतःची काळजी न घेता रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याची विशेष दखल घेण्यात आली. याच अनुषंगाने मणिपाल हॉस्पिटल, बाणेर यांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून बाणेर वाहतूक विभागातील वाहतूक अमलदारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य तपासणी उपक्रमात बाणेर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद डोंगरे यांच्यासह वाहतूक अमलदार संदेश दापकेकर, अनिल माने, राम जाधव, निलेश बेडके, सागर बाबरे, प्रशांत चाटे, अशोक काळे व गोरगेल सर उपस्थित होते.

तपासणीदरम्यान रक्तदाब, साखर, हृदयविकाराशी संबंधित प्राथमिक चाचण्या तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. कडक उन्हात, धुळीत व वाहतुकीच्या तणावात सातत्याने काम करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याबाबत अशी काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.

मणिपाल हॉस्पिटल बाणेर यांच्या या उपक्रमाचे उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत करत आभार व्यक्त केले. हा उपक्रम समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

See also  बालगंधर्व रंगमंदिर कला दालनातील चित्र प्रदर्शनाचे मुरलीधर लाहोटी यांच्या हस्ते उद्घाटन