पुणे : भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिताताई कदम ह्यांच्या हस्ते करण्यात आले, मुलांना मार्गदर्शन करताना “आजच्या युगात विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रयोगातून शिकावे, पुस्तकी ज्ञानासोबतच अशा स्पर्धांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो” असे नमूद केले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह मा. डॉ. के. डी. जाधव यांनी स्पर्धेत जिंकण्यापेक्षा सहभाग घेणे आणि आपले विचार मांडणे हे जास्त महत्त्वाचे आहे, आज मांडलेला छोटासा प्रकल्प भविष्यात मोठे संशोधन ठरू शकतो असे नमूद केले व असे उपक्रम सातत्याने आयोजित करणे गरजेचे आहेत, असे मत मांडले.”
स्पर्धेमध्ये पुण्यातील नामांकित ७५ शाळांच्या २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. मानसिंग राठोड, प्रा. डॉ. पी. पी. शिंदे, प्रा. विद्या खोबरे यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये अनुक्रमे पहिला क्रमांक सिग्नेट पब्लिक स्कूल, नऱ्हे शाळेच्या किंजल बुल्हे, मृण्मयी मांढरे यांनी, द्वितीय क्रमांक सरहद स्कूल, धनकवडी शाळेच्या कु. स्वराज निवंगुणे, लावण्या ढेरे यांनी व तृतीय क्रमांक जाधवर इंटरनॅशनल स्कूल, नऱ्हे शाळेच्या भारती चौधरी, मनिष चौधरी यांनी पटकावला. विजेत्यांचे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी भारती विद्यापीठ परिवार चे अध्यक्ष मा. श्री. बाबा शिंदे, भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी मा. डॉ. राजेंद्र मोहिते व मा. डॉ. सुहास मोहिते, भारती विद्यापीठ नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. वसंतराव माने, तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख, उपप्राचार्य श्री. अमित पाटील , स्पर्धा समन्वयक प्रा. सौ. सुजाता पाटील, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा पवार, कु. प्रतीक सगळगी, कु. समृद्धी कदम यांनी केले.
























