कर्वेनगर प्रभाग ३० क मध्ये तेजल दुधाने यांचा घरोघरी प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्वेनगर, पुणे प्रतिनिधी : कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३० क मधून पक्षाच्या अधिकृत उमेदवार तेजल दुधाने यांनी कर्वेनगर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये घरोघरी भेटी देत प्रचार केला. यावेळी त्यांना ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याची माहिती देण्यात आली.

प्रचारादरम्यान वस्ती भागातील रस्त्यांची दुरवस्था, अस्वच्छता, नागरी सुविधा आदी मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तेजल दुधाने यांनी मागील अनेक वर्षांपासून परिसरात राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती नागरिकांना दिली.

कर्वेनगर परिसरात प्रचार कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप केले. यावेळी तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या काही नागरिकांनीही तेजल दुधाने यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि गेल्या अनेक वर्षांत केलेले सामाजिक कार्य याच्या बळावर आपण निवडून येऊ, असा विश्वास तेजल दुधाने यांनी व्यक्त केला.

प्रचारादरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत, विकासकामांना गती देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

See also  काँग्रेस पक्ष कार्यालया मध्ये राजकीय भेळभत्ता कार्यक्रम