बाणेर येथे पंचशील युवक संघाच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

बाणेर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त बाणेर येथे  रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर व फुट थेरपी मसाज इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम पंचशील युवक संघ व बाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होते.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नितीन रनवरे सिद्धार्थ रनवरे,गणेश कळमकर, स्वप्नाली सायकर,  लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे , प्रकाश बालवडकर, जीवन चाकणकर, सुधाकर धनकुडे,सुभाष भोळ, विकास रानवडे, प्रवीण आमले,डॉ बिनवडे, चंद्रहास शेट्टी आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे आयोजन नितीन प्रकाश रनवरे( अध्यक्ष एससी एसटी कोथरूड उत्तर मंडल) यांनी केले. यावेळी 50 जणांनी रक्तदान केले.

See also  सामाजिक उन्नतीच्या दिशेने पाऊले टाकण्याचा निर्धार - माजी सैनिक मारूती कांबळे यांची रयत स्वाभिमानी संघटना उपाध्यक्षपदी निवड