मराठी पाट्यांच्या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांचे औंध बाणेर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकरांना निवेदन

औंध : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाणेर बालेवाडी,बाणेर, औंध, पाषाण परिसरातील पदाधिकारी यांच्याकडून औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना सुहास निम्हण व अनिकेत मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मराठी पाट्या करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना उपस्थित शाखाध्यक्ष अभिजीत चौगुले, मयूर सुतार, निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार,दत्तात्रय रणदिवे, चेतन धोत्रे, अमर अढागळे, किरण रायकर, अनिल व्हटकर, किशोर भोपळे, बालाजी मुळे,किशोर रायकर, कार्तिक रायचूरकर उपस्थित होते.

यावेळी औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर मराठी पाट्या लावण्याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. औंध क्षेत्रीय कार्यालय तसेच परिसरातील दुकानांना याबाबत सूचना देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे