कोथरूड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांचे आमदार सचिन आहेर यांच्या हस्ते उद्घाटन

कोथरूड : पौड रोड, कोथरुड पुणे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे दोन ठिकाणी नामफलक उद्घाटन करण्यात आले.

राजमाता जिजाऊ नगर (सुतारदरा) शाखा आणि मोरे विद्यालय चौक ह्या दोन ठिकाणी उद्घघाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन जयदीप पडवळ (मा. सभासद पुणे मनपा) ह्यांनी केले तसेच भोर वेल्हा मुळशीतील अनेक युवा कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला.

शाखेचे उद्घघाटन आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, मा. संजय मोरे , सचिन खैरे, अविनाश बलकवडे, भारत सुतार, नितीन शिंदे, कालिदास शेडगे, स्वाती ढमाले, वैभव दिघे, सविताताई मते, छायाताई भोसले, कस्तुरीताई पाटील, किशोर सोनार,जगदीश दिघे,दिलीप गायकवाड,मारूती वर्वे , राम थरकुडे, राजेश पळसकर, अक्षय वर्वे आणि शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजक दीपक दिघे ,प्रकाश दिघे, संतोष दिघे, सागर दिघे हे होते.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर जमली राजकारणापलीकडच्या किस्स्यांची मैफिल