जेएसपीएमच्या पार्थची ॲमेझॉन मध्ये निवड

पुणे : जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलीटेक्निक महाविद्यालय वाघोली येथील माहिती व तंत्रज्ञान विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी पार्थ मंगेशराव भाले याची ॲमेझॉन या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली आहे. पार्थ भाले यास वार्षिक 3.85 लाखांचे पॅकेज देण्यात आले असून त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला.

कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये पार्थने उत्कृष्ट कामगिरी करत विभागाचे नाव उज्वल केले.अभ्यासासोबतच तांत्रिक कौशल्य, मेहनत व सातत्याच्या जोरावर विद्यार्थ्याने हे यश संपादन केले आहे. या यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता व प्लेसमेंट परंपरा अधोरेखित झाली असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ही निवड प्रेरणादायी ठरली आहे.आधुनिक प्रयोगशाळा ,उद्योग- केंद्रित प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य वाढवणारे प्रकल्प आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने वाढत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. पार्थ च्या यशाचे संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.डॉ. तानाजीराव सावंत,  उपाध्यक्ष श्री.गिरीराज सावंत व विश्वस्त ऋषिराज सावंत यांनी कौतुक केले. पार्थने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांच्या पाठिंबाला दिले. संस्थेमार्फत त्याचा कुटुंबीयांसोबत सत्कार करून त्याला पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जेएसपीएम वाघोली संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे , सहाय्यक संचालक  प्रा. एस. के. वाकचौरे, प्राचार्य डॉ. प्रदीप काळे, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डी. आर. शिंदे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

See also  महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, तिचा निर्घृण खून करण्यात आला: रमेश चेन्नीथला