ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे : भारतामध्ये गेल्या काही वर्षांत ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग आणि फँटसी स्पोर्ट्स ॲप्सच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. या झपाट्याने वाढलेल्या उद्योगामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली, तरी दुसऱ्या बाजूला हजारो कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. कर्जबाजारीपणा, मानसिक नैराश्य, कौटुंबिक ताणतणाव तसेच आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही याची भयावह परिणती ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक सोशल फाउंडेशन, पुणे या संस्थेने या विषयावर सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत सरकारच्या गृह मंत्रालय व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. निवेदनात ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्याची ठोस मागणी नागरिक सोशल फाउंडेशनचे अॅड. सर्वेश मेहंदळे यांनी आज पत्रकार परिषदेत  केली. 

विविध राज्य सरकारांच्या नोंदी व राष्ट्रीय माध्यमांतील अहवालांनुसार, ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे देशभरात १०० ते १५० पेक्षा अधिक आत्महत्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे ₹१५,००० ते ₹२०,००० कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान भारतीय नागरिकांना या ॲप्समुळे सहन करावे लागत आहे. तपास यंत्रणांनी या प्लॅटफॉर्म्सचा वापर मनी लॉन्डरिंग, हवाला व्यवहार, आतंकवादी फंडिंग, मानव तस्करी व इतर समाजविघातक गुन्ह्यांसाठी होत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक सोशल फाउंडेशन, पुणे या संस्थेने या विषयावर सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत सरकारच्या गृह मंत्रालय व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. निवेदनात ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे.

नामवंत सेलिब्रिटी व क्रीडापटू मोठ्या मोबदल्यात या ॲप्सचे प्रमोशन करत असल्यामुळे युवकांमध्ये या प्लॅटफॉर्म्सबाबत आकर्षण वाढले आहे. परिणामी विद्यार्थी, युवक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सर्वाधिक बाधित होत आहेत. त्यामुळे प्रस्तावित ऑनलाईन गेमिंग (प्रमोशन व रेग्युलेशन) कायदा हा केवळ कायदेशीर सुधारणा नसून, समाजाच्या आरोग्यासाठी व युवकांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार आहे.

यावेळी नागरिक सोशल फाउंडेशनचे अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदि मान्यवर  उपस्थित होते. 
मुख्य मागण्या :
• ऑनलाईन बेटिंग व गॅम्बलिंग ॲप्सवर कठोर व प्रभावी अंमलबजावणी
• सेलिब्रिटी प्रमोशनबाबत स्पष्ट नैतिक व सामाजिक जबाबदारी निश्चित करणे
• अशा ॲप्सचे वापरकर्ते व प्रवर्तक यांच्यावरही दंडात्मक तरतूद लागू करणे
• वारंवार उल्लंघन करणाऱ्यांसाठी अधिक कठोर शिक्षा व कारावासाची तरतूद
• महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन बेटिंगविरोधात स्वतंत्र सायबर विभाग स्थापन करणे

See also  थोरात गार्डन ग्रुपतर्फे रक्तदान, डोळ्याच्या तपासणी शिबिर आणि शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी – २२ रक्तपिशव्या संकलित