पुणे :- लाईट मीटर कनेक्शन कायमचे खंडीत केले होते. ते लाईट मीटर पुन्हा चालू करण्यासाठी व लाईट बिल ऑनलाईन चालू करण्यासाठी लोकसेवक सोहिल शेख यानी तक्रारदार यांचेकडे ६ हजार ५०० रुपयांची लाच मागून, ती लाच स्वीकारताना महावितरणाच्या हडपसर उपविभाग-२, पुणे येथील कनिष्ठ कार्यालयीन सहायकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंगा व्हिलेज शाखा, हडपसर येथील महावितरण कार्यालयातून मंगळवार (ता.२१) रंगेहाथ पकडले.सोहिल सुलेमान शेख, वय ४२ वर्ष, पद कनिष्ठ कार्यालयीन सहायक (वर्ग-३) गंगा व्हिलेज शाखा, महावितरण कार्यालय, बंडगार्डन विभाग, हडपसर उपविभाग-२, पुणे.असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटचे लाईट मीटर कनेक्शन कायमचे खंडीत केले होते. ते लाईट मीटर पुन्हा चालू करण्यासाठी व लाईट बिल ऑनलाईन चालू करण्यासाठी सदरचे काम आरोपी यांनी तक्रारदार यांना ६ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.दरम्यान, तक्रारदार यांच्याकडून ती लाच स्विकारल्यावर आरोपी शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.