राज्यात ज्यावेळी आमचे सरकार येईल त्यावेळी या दलालांना तुरुंगात टाकू – युवा सेना नेते आदित्य ठाकरे

मुंबई :  राज्यात ज्यावेळी आमचं सरकार येईल. त्यावेळी या दलालांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही.  तसेच विधानसभा अध्यक्षांच्या बंधूच्या वार्डात एकही रस्ता झालेला नाही. हे भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांना देखील मुंबई महानगरपालिकेत कुणी घोटाळा केला आहे. तसेच तुम्हाला देखील वाटतं असेल तर घटनाबाह्य सरकारला पाडून दाखवा. असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माझ्याकडे मुंबईतील पन्नास रस्त्यांची यादी आहे. त्या मुंबईतील पन्नास रस्त्यांची काम करून दाखवा. गेल्या दहा वर्षापासून मुंबई शहारातील रस्त्यांची काम कशी होतात. ती पाहली आहेत. ५० रस्त्यांची यादी आली असून या रस्त्यांची कामं कमीत कमी दिवसात पुर्ण करू शकतील. परंतु या मिंधे सरकारने एकही रस्त्याचं काम केले नाही. १०० वर्षाच्या इतिहासात कमीत कमी रस्त्याचे टार्गेट घेणारी ही पहिला महानगरपालिका होती.परंतु त्यांनी हे देखील केले नाही असे  आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या काही मस्तीखोर अधिकाऱ्यांनी आणि खोके सरकारच्या आणि अलीबाबाच्या परिवारातल्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीनी फोन करून एका शिवसेनेच्या शाखेवर हातोडा चालवला. त्यामुळे आता प्रत्येक सभा, प्रत्येक मोर्चा आणि प्रत्येक निवडणुकांमधून त्यांना उत्तर देण्यात येईल. तसेच आपले सरकार आल्यावर त्यांच्यावर बुलडोझर चालवल्या शिवाय राहणार नाही असे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.

See also  घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे