पुणे डॉक्टर्स असोसिएशनची आरोग्य दिंडी ;अवयव दान जनजागृती आणि वारकरी तपासणी शिबीर


पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन ने यावर्षी पुणे ते सासवड आरोग्य दिंडी चे आयोजन करून अवयवदान जनजागृती अभियान आणि वारकरी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

सदर उपक्रमाची सुरुवात ही पुलगेट येथून वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची पूजा करून अध्यक्ष डॉ राज लवंगे,सन्माननीय माजी अध्यक्ष डॉ प्रकाश कोठावळे सर,डॉ स्मिता घुले मॅडम,डॉ संभाजी करांडे, डॉ राजेश माने ,सर्व माजी अध्यक्ष आणि सर्व सन्मानीय सिनियर सभासद आणि बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व संस्थेचे सन्मानीय सभासद,संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी मंडळ उपस्थित होते.

आरोग्य दिंडी” माऊलींच्या जयघोषात, अवयवदान ची जनजागृती करत दिंडीची सुरवात करण्यात आली, यामध्ये 80 पेक्षा ही जास्त डॉक्टर्स दिंडी मध्ये सहभागी झाले होते.


पायी वारी करताना अनेकांना रस्त्यावर ही उपचार करत (दिवे)सासवड येथेआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करत असंख्य वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ दत्तात्रय शिंदे,सचिव डॉ.दिपाली वाघ,खजिनदार डॉ सचिन लकडे ,सहसचिव डॉ स्वप्नाली वाडेकर,सहखजिनदार डॉ अश्विनी घोडके ,नियोजित अध्यक्ष डॉ सचिन केदार,सामाजीक उपक्रम प्रमुख डॉ संतोष कवितके,सर्व कार्यकारिणी सदस्य,या उपक्रमाचे सर्व समन्वयक, डॉ प्रदिप महाजन, डॉ, प्रताप खोडदे, डॉ अजय इंगळे, डॉ सुनिल धुमाळ, डॉ कविता ढमाले, डॉ, सारिका परदेशी, डॉ अश्विनी गुजर यासर्वांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अपरिमित कष्ट घेतले.

See also  खडकी रेल्वे स्टेशन जवळ ॲम्युनेशन फॅक्टरी आणि किर्लोस्कर फॅक्टरी  यांना जोडणारा रेल्वे ट्रॅक पातळी सुधारणा