पुणे, २१ जुलै २०२६: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे २६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेली २७ वर्षे सातत्याने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, माजी आमदार विनायक निम्हण हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत होते. आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत सलग २७ वर्षे माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.
खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड या ठिकाणी ही स्पर्धा २६ जुलै रोजी रंगणार आहे. हि स्पर्धा ६ वर्षावरील ते १८ वर्षांवरील वयोगटात रंगणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत १०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तिपत्रक आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पदके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ पर्यंत असून नावनोंदणीकरिता https://forms.gle/xSCetWYaMevZLvmN6 या सांकेतिक स्थळावर अथवा पुष्कर कुलकर्णी(९८२२५६६६०५) यांना संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने तिसऱ्या कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सन्माननीय सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने सलग तिसऱ्या वर्षी हि स्पर्धा सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे दिनांक ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान रंगणार आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा खेळवण्यात येणार असून दोनही गटातील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. नावे नोंदविण्याची अंतिम तारीख २२ जुलै, २०२६ असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यातील खेळाडूंनी आपापल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा १ व २ ऑगस्ट रोजी पाषाण सुस रोड येथील पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेत २०० खेळाडूंनी आतापर्यंत आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत फिडे मास्टर आरएस गुप्ता(२१८५), अरेना आंतरराष्ट्रीय मास्टर अलौकिक सिन्हा, अरेना फिडे मास्टर सम्यक कुलकर्णी, नैतिक माने, कॅनडियन प्लेयर विआन कलगटे यांसारखे २५० रेटेड खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२६ असून नावनोंदणीसाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण २,००,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.
पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक २०२६ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १ व २ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ असून सर्व सहभागी खेळाडूंना https://poonagame.com/ या संकेत स्थळावर नावनोंदणी करता येणार आहे. तसेच, स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यांतून ३०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ९ ऑगस्ट २०२६ या दिवशी पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड या ठिकाणी होणार आहे. तसेच हि स्पर्धा ८,१०,१२,१४ वर्षांखालील मुले व मुली या गटात रंगणार असून रोख पारितोषिक यांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत. स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख २ ऑगस्ट २०२६ रोजी असून सत्यजित शिंदे(९८२२०१५५७०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या यांच्या मान्यतेखाली तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा फ्रेशर्स, सब ज्युनियर गट, कॅडेट गट, ज्युनियर गट आणि वरिष्ठ गटात होणार असून स्पर्धेत ५०० खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. क्युरोगी आणि पुंगसे या प्रकारात हि स्पर्धा २१ व २२ ऑगस्ट २०२६ या दिवशी सुस रोड येथील पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड येथे पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक, करंडक, टी शर्ट देखील देण्यात येणार असून बेस्ट फायटर पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६ असून नाव नोंदणीसाठी अमोल तोडणकर(९७६६०००००७)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयजोंकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या तसेच सोमेश्वर फॉउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या निमंत्रित इनडोअर धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाषाण सुस रोड येथील पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड येथे पार पडणार आहे. अशा प्रकारची इनडोअर धनुर्विद्या स्पर्धा प्रथमच पुण्यात होत असून हि स्पर्धा १०, १३, १५, १८, २१ वयोगटात रंगणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक, करंडक, सर्व सहभागी खेळाडूंना टी शर्ट व पदके देखील देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या स्पर्धेत सहभागी होऊन उस्त्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे. नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२६ असून नाव नोंदणीसाठी राम शिंदे(९५११२६३५२४) अथवा विशाल डुमणे(९३५६३२३१०७)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयजोंकांच्या वतीने करण्यात आले आहे.
















