पुण्यात दोन दिवसांत विविध आंदोलने

(विशेष प्रतिनिधी)  पुणे : गेले दोन दिवस शहरात नागरिक, विद्यार्थी यांची उत्स्फूर्त आंदोलने झाली, याची दखल राज्य सरकारला, सत्ताधारी भाजपला घ्यावी लागेल.

एमपीएससी परीक्षेतील घोटाळ्याविरोधात विद्यार्थ्यांचा अपेक्षेपेक्षाही मोठा मोर्चा सोमवारी निघाला. राज्यभर मोर्चाची चर्चा झाली. प्रसारमाध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली. राज्याच्या सर्व भागातून आलेले विद्यार्थी त्यात होते. ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. त्या आंदोलनाचे पडसाद वेगवेगळ्या राज्यात उमटत आहेत. झारखंड राज्यात परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ विद्यार्थी एकवटले होते. महाराष्ट्रात एमपीएससी चे विद्यार्थी एकत्र आले आहेत.

गणेशोत्सवात डिजेवर बंदी आणावी, याकरीता हजारो नागरिक रस्त्यावर आले, त्यांनी मोर्चा काढला. मोर्चा उत्स्फूर्तपणे निघाला होता. लाऊडस्पिकर विरोधी कृती समिती स्थापन झाली. त्या समितीने मोर्चा आयोजित केला होता. त्याच दिवशी हिंजवडी आयटी पार्कमध्ये नागरि सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आयटीयन्सनी मोठे आंदोलन केले. ते आंदोलनही उत्स्फूर्त होते. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरा या मागणीकरीता राज्यव्यापी आंदोलन पुण्यात सोमवारी झाले.

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण आंतरवली सराटी येथे चालू आहे. येत्या १२ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची तयारी अनेक गावं आणि शहरांमध्ये चालू आहे.

या आंदोलनांमुळे समाजातील अस्वस्थता दिसून येते. त्याची दखल मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागेल आणि काही ठोस पावले तातडीने उचलावी लागतील.

See also  माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर