योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला नगरसेविका, संचालिका व कर्मचार्‍यांचा सन्मान

बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिला संचालिका व कर्मचार्‍यांचा नगरसेविका रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्या शुभहस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिला सभासदाला कर्ज वितरण करण्यात आले. नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचाही संस्थेच्या वतीने  विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेत 50% पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत व संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेत नेहमीच आम्ही महिलांना सन्मानाची वागणूक देत असतो परंतू महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान कर्तुत्ववान महिलांच्या शुभहस्ते दरवर्षी करण्यात येतो.

याप्रसंगी शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालिका रंजना कोलते, सहयोगी संचालिका निकिता माताडे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे तसेच सर्व कर्मचारी व खातेदार उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.

See also  वारकऱ्यांची जाहिर माफी मागा , आप युवक शहराध्यक्ष रविराज काळे