राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा निरीक्षकपदी सुनील माने

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा निरीक्षक पदावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत आज पत्र सुनील माने यांना मुंबई येथे दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर, तालुका व जिल्हयातील ग्रामीण प्रभाग व बूथ पातळीवर पक्षाचा आढावा घेणे, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल व विभागाच्या संघटनेच्या पदावरील नियुकत्यांचा आढावा घेणे, संघटनात्मक मजबूती, कार्यकर्ता सक्रियता व बुथ समित्या कार्यान्वयित आहेत का याचा सातत्याने आढावा घेणे, पक्षशिस्त व संघटनेमध्ये एकसंघता ठेवण्यासाठी कार्यरत राहणे. कोणतीही गटबाजी, अनुशासन भंग, पक्षविरोधी वक्तव्य किंवा कृती आढळल्यास त्यावर तत्काळ हस्तक्षेप करून प्रदेश कार्यालयास अहवाल सादर करणे, स्थानिक प्रश्न, जनभावना व राजकीय परिस्थितीचा निष्पक्ष अहवाल सादर करणे, प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध कार्यक्रम, आंदोलने याचा आढावा घेऊन त्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवणे, निवडणूक पूर्वतयारी, संभाव्य उमेदवारांचे मूल्यमापन, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संघटनात्मक रणनिती सुचवणे, मासिक प्रगती अहवाल नियमितपणे प्रदेश कार्यालयास सादर करणे, जिल्हा संघटना वरिष्ठ नेतृत्व यांच्यात समन्वय साधने आदि जबाबदऱ्या निरीक्षक म्हणून सुनील माने यांना सांभाळाव्या लागणार आहेत.  

See also  पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा