जनगणना अभियानात सहभागी व्हा पालिका आयुक्तांचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय जनगणना (२०२७) अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

यंदाच्या डिजिटल जनगणनेमध्ये स्व-गणना (सेल्फ एन्युमरेशन) हा सुलभ पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था आणि सर्व घटकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आयुक्तांनी निवेदनात म्हटले आहे.

जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान असलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. असे आयुक्तांनी निवेदनात नमूद केले आहे.

See also  बाणेर बालेवाडी व राजीव गांधी आयटी पार्क मधील नागरिकांच्या समस्या बीबीपीआरएच्या कोअर कमिटी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडल्या