“नमो चषक” स्पर्धाँमुळे विविध क्रीडाप्रकारांना व स्थानिक खेळाडूंना वाव – ना. चंद्रकांतदादा पाटील

कोथरूड : युवा आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमो चषक ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असून ह्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना आणि तो खेळ खेळणाऱ्या सर्वांना आपले खेळातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

कोथरूड मतदार संघाच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोथरूड मंडल ( दक्षिण ) अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड उत्तर चे अध्यक्ष सचिन पाषाणकर, कोथरूड मंडल सरचिटणीस आणि महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून कॅरम चे राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती अवार्ड विजेते अनिल मुंडे आणि भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर उपस्थित होते. तसेच मंडल सरचिटणीस दीपक पवार,बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे,युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. कल्याणी खर्डेकर उपस्थित होते.


यास्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक किशोर भोंडवे यांनी तर द्वितीय क्रमांक साई डोंगरे आणि तृतीय क्रमांक चरण खुडे यांनी पटकावले.
ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत राजाभाऊ ठाकूर विजेते तर पंकज कुलकर्णी उपविजेते ठरले.
महिलांच्या गटात शुभदा गोडबोले विजेत्या तर लता भावे उपविजेत्या ठरल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजयुमो क्रीडा आघाडी चे पदाधिकारी अनिश अग्रवाल,चैतन्य इनामदार, ओंकार कुडले , प्रणव वडनेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रतीक खर्डेकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले. पुढील आठवड्यात शिवकालीन कला स्पर्धा ( लाठी काठी ) तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करत असल्याचे ही प्रतीक खर्डेकर यांनी जाहीर केले.

See also  ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या भेटीबाबत भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधीर मोहोळ