पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) आढावा बैठकीचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले. या बैठकीस पक्षाचे शहर (जिल्हा) निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटनेच्या वाढीसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्ष संघटनेविषयी सूचना तसेच आगामी राजकीय रणनीती याबाबत मते जाणून घेण्यात आली.
यावेळी बोलताना सुनील माने यांनी, “सामूहिक नेतृत्व आणि संघटित प्रयत्नांच्या जोरावर लोकनेते Sharad Pawar यांच्या पक्षाला शहरात पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीस शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष संतोष कवडे, शहर सरचिटणीस जयंत शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, उपाध्यक्ष संदीप देसाई, काशिनाथ बामणे, सुनील कस्पटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव, उद्योग व व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, ग्राहक संरक्षण सेलचे शहराध्यक्ष संजय पडवळ, ख्रिश्चन सेलचे शहराध्यक्ष शौल कांबळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, शहर चिटणीस विजय बाबर, पोपट पडवळ, शहर संघटक राजू खंडागळे, शहर सचिव योगेश सोनवणे, परमेश्वर गायकवाड, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्षा कल्पना घाडगे, युवक शहर सरचिटणीस अश्रफ शेख तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन मोरे यांच्यासह विविध फ्रंटल व सेलचे प्रमुख पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ व प्रभागांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळात शहरातील संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून पक्ष विस्तारासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
















