डॉक्टर दिनानिमित्त बाणेर येथील एलिट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सन्मान

बाणेर : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त बाणेर येथील एलिट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे डॉक्टरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. समाजसेवेत व आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ डॉ. श्रीराम मसळेकर, डॉ. निखील देवे, डॉ. प्रदीप चौधरी, डॉ. योगेश पाटील, डॉ. पूजा इडोळे, डॉ. अक्षय भोर आणि डॉ. प्रतीक्षा तांबे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

प्रबोधनकार साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या हस्ते, तसेच महाळुंगे गावचे माजी सरपंच मयूर भांडे, विभागप्रमुख ऋतिक भांडे आणि महेश भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत, समाजाच्या निरोगी भविष्यासाठी वैद्यकीय क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला डॉक्टर, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

See also  औंधगावात श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२६ निमित्त ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन