बाणेर : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बिटवाइज बिल्डिंगजवळ, मोहन नगर, बाणेर येथे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत व्यावसायिक वाहनांवर कारवाई करत पाच वाहने जप्त केली.
ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे उभी करण्यात आलेली एक तीनचाकी व चार चारचाकी अशी एकूण पाच व्यावसायिक वाहने अतिक्रमण विभागाने जप्त केली. या कारवाईत अतिक्रमण निरीक्षक श्री नितीन खैरनार, सहायक अतिक्रमण निरीक्षक श्री कुणाल राठोड, श्री अनिल देशमुख व कर्मचारी सहभागी होते.
सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
















