बालेवाडी ३० डिसेंबर रोजी येथे श्री अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

बालेवाडी : बालेवाडी येथे श्री अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा निमित्त आयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेला मंगल अक्षता कलश व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे पूजन कार्यक्रमाचे आयोजक शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी विठ्ठल मळा (गो-शाळा) बालेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट बालेवाडी चे अध्यक्ष संजय बालवडकर व माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे) यांच्या प्रेरणेतून करण्यात आले आहे.

यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बाणेर येथील सावता माळी मंदिर ते विठ्ठल मळा बालेवाडी दरम्यान पालखी मार्ग असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे सकाळी साडे सात वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. बाणेर बालेवाडी पंचक्रोशी मधील नागरिकांनी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर