जलसमृद्ध पुण्यासाठी खडकवासला धरणावर पारंपरिक जलपूजन

पुणे : पुणे शहराला वर्षभर मुबलक पाणीपुरवठा व्हावा आणि पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, या प्रार्थनेसह आज (बुधवार) खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी पारंपरिक पद्धतीने साडी, चोळी आणि नारळ अर्पण करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांना वर्षभर अखंड आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

या जलपूजन सोहळ्यास आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सोपान चव्हाण, सचिन मोरे, प्रसन्न जगताप, सुभाष नाणेकर, भारत भूषण बराटे, नगरसेविका कोमल नवले, जयश्री भुमकर, सहकारी नगरसेवक, स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक सोहळ्याद्वारे जलस्रोतांविषयी कृतज्ञता व्यक्त करत जलसंवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

See also  पुणे शहरातील महापालिका मालकीच्या आणि नियंत्रित सर्व भाजी मंडई चालू करण्याची आपची मागणी