बाणेर : आनंदवन हास्य परिवार या संस्थेमार्फत मंगळवार दिनांक १४ जुलै रोजी पहाटे , ३ ते दुपारी १२ वाजेपर्यंत , संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पायी जाणाऱ्या सुमारे ६५०० वारकऱ्यांना , मोफत ,चहा बिस्किटे , जेवण व पाणी वाटप पालखी मार्गावर , दौंडज येथे करण्यात आले .
गेली सलग ३ वर्षे बाणेर येथील मुरकुटे गार्डन मधील आनंदवन हास्ययोग ग्रुपचे अध्यक्ष , सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अजय कदम , यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी सेवा प्रतिवर्षी ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने सेवाभावी वृत्तीने पुण्यातून जाऊन करीत आहेत.
या अन्नदान सेवा स्थळी , पुण्यातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप कदम यांच्या , मेडिनेक्स्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वीरभद्र नगर बाणेर तर्फे संयोजकांच्या माध्यमातून वारकऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा मोफत देण्यात आली होती. याचा लाभ शेकडो वारकऱ्यांनी घेतला. बाणेर येथील आनंदवन हास्य परिवार या ज्येष्ठ नागरिकांतर्फे वर्षभर वेगवेगळे सामाजिक सेवा आणि आरोग्य सेवा विषयक विविध उपक्रम राबवले जातात. तुकाराम महाराजांचे आठवे वंशज श्री ऋषी मोरे यांनी या अन्नदान शिबिरास भेट देऊन , आनंदवन परिवाराची प्रशंसा केली.
या कार्यक्रमास श्री दिलीप बोरकर श्री राजू मालू ,श्री प्रताप कवाडकर , श्री रवींद्र रणखांबे , श्री जगन्नाथ मठ, श्री बद्रीनाथ महाराज , डॉ. राजेंद्र खैरनार , श्री हेमंत बोरकर , सौ अलका मांगले , सौ जयश्री देशमुख , सौ ज्योती कदम , श्री भिमराव सोळंकी , सौ अलका जाधव , डॉ. जनार्दन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.















