पाषाणचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर शंकरराव निम्हण यांचे निधन

पाषाण : पाषाण गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व माजी स्थायी समिती अध्यक्ष कै. शंकरराव एकनाथ निम्हण (वय ८०) यांचे शनिवारी (१८ जुलै) पहाटे १.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

शंकरराव निम्हण यांनी सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे कार्य करत पाषाण परिसराच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. स्थानिक नागरिकांमध्ये ते अभ्यासू, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पाषाण परिसरासह पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर शनिवार, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाषाण स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

See also  महावीर जयंती निमित्त आनंद दरबार येथे 'अहिंसारत्न' पुरस्काराचे वितरण