इंग्लंडमध्ये टाउन कौन्सिलरपदी निवड झालेल्या शैलेश शिंदे यांचा मुळशीत सत्कार; मुळशीच्या अभिमानाचा पॅटर्न

पुणे : आंदगाव-शिंदेवाडी येथील रहिवासी शैलेश शिंदे यांची इंग्लंड येथे टाउन कौन्सिलर (नगरसेवक) म्हणून निवड झाली आहे. नुकतेच शैलेश शिंदे यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

अॅडव्होकेट गणेश सातपुते आणि विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड यांच्या हस्ते शैलेश शिंदे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सतीश फुगे, सीताराम तोंडे, वैभव पवळे, विलास अमराले, भरत गायकवाड, रेश्मा गायकवाड आणि प्रशांत भुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी राम गायकवाड म्हणाले, मुळशी तालुक्याचा अभिमानाचा पॅटर्न देखील सध्या मुळशीकर अनुभवत आहेत. मुळशीचे युवक देशात तसेच परदेशात देखील गावाचे व महाराष्ट्राचे नाव वाढवत आहेत याचा सर्व मुळशीकरांना अभिमान वाटतो.

आंदगाव-शिंदेवाडी परिसरातील तरुणाने परदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवत टाउन कौन्सिलरपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिसरातून शैलेश शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

See also  बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचा शनिवारी बंद