माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने होणार चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप

बाणेर :माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह चे निमित्त साधून चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, आमचे मार्गदर्शक पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी सेवा सप्ताह चे आयोजन केले जाते. त्याच निमित्ताने सामाजिक सेवा म्हणून औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी येथिल चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी १० जून ते १७ जून पर्यंत 8308123555 ह्या नंबर वरती नाव नोंदणी करावी असे आव्हान करत आहे.

या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सनी विनायक निम्हण यांनी नेहमीच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबिर, पुणेआयडॉल, तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबवत समाजातील वेगवेगळ्या घटकांची सेवा कशा पद्धतीने करता येईल हे त्यांच्या उपक्रमाद्वारे साध्य केले जाते. यावेळी यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रम ते राबवत आहे.

See also  लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे