घरगुती सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी होणार : मोदी सरकारचे महिलांना राखी पौर्णिमेचे गिफ्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला असून उद्यापर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिलं आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे.

See also  हडपसर येथील दूषित पाणी येत असलेल्या परिसराची शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांची पाहणी