बालेवाडी : लाविदा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बालेवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त आकर्षक मंडप उभारण्यात आला असून, परिसरात देखणी सजावट करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनाने सोसायटीमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सोसायटीतील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. विविध उपक्रमांमुळे गणेशोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग प्राप्त झाला आहे.
गणेश आरती, धार्मिक कार्यक्रमांसह मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोसायटीतील नागरिक एकत्रितपणे उत्सव साजरा करत असल्याने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एकोपा वाढावा, लहान मुलांना संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी आणि सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करावा, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
















