बाणेरमधील डेरॉन हाईट्सच्या रुफटॉपवर आग; रूफटॉप अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का?

पुणे : बाणेर परिसरातील डेरॉन हाईट्स इमारतीच्या छतावरील (रुफटॉप) भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे रूफटॉप वरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे. आगीचे नेमके कारण तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इमारती वरती अनधिकृत रित्या बांधकाम करण्यात आले आहे. बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रूफटॉप हॉटेल्स चालवली जात आहेत. इमारतीच्या छतावर हॉटेल्सला परवानगी नसताना देखील अनधिकृत रित्या बांधकाम करून व शेड टाकून सर्रास हॉटेल चालवली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने अशा हॉटेल्स वर कडक कारवाई केली जात नाही. दुर्घटना घडल्यानंतरच कारवाईचा बडगा उभारण्यात येतो यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

See also  बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट