कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वडाचे वृक्षारोपण
वसुंधरा तर्फे साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली

बाणेर : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माननीय कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. वसुंधरा अभियान च्या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थितांनी कै. अजितदादा पवार यांच्या कार्याचा व नेतृत्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले ठोस निर्णय, प्रशासनातील शिस्त आणि लोकाभिमुख कार्यशैली कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

वडाचे वृक्षारोपण करून त्यांच्या विचारांची आणि कार्याची आठवण चिरंतन ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. साश्रू नयनांनी उपस्थितांनी कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

See also  महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस