राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सच्चियाय मातेची आरती संपन्न

पुणे : कात्रज येथील स्व.माणिकचंद नारायणदास दुगड यांनी स्थापित केलेले श्री सुसवाणीमाता सच्चियाय माता चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात राजस्थानचे महामहिम राज्यपाल तथा महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्री. हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सच्चियाय मातेची विधिवत आरती संपन्न झाली. यावेळी राज्यपाल बागडे यांनी सच्चियाय मातेचे दर्शन घेत देशातील नागरिकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या हस्ते स्व. सौ. पुष्पादेवी माणिकचंद दुगड सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी दुगड परिवाराच्या गोसेवेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “दुगड परिवाराकडून मोठ्या प्रमाणात गोसेवा केली जाते. गोसेवेसोबतच धार्मिक आणि सामाजिक कार्यातही दुगड परिवाराचे योगदान उल्लेखनीय आहे.” राजस्थानी समाजामध्ये धर्म आणि देवदेवतांप्रती श्रद्धा मोठ्या प्रमाणात असून, गोसेवेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी गोशाळा चालवून मोठ्या प्रमाणात गोसेवा केली जाते. आपापला व्यवसाय करत कष्टाने उदरनिर्वाह करणारा हा समाज धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरतीनंतर महामहिम राज्यपाल बागडे यांनी मंदिर परिसरातील धार्मिक वातावरणाची पाहणी केली. यावेळी दुगड परिवाराच्या वतीने करण्यात येणाऱ्या गोसेवेची माहिती घेत त्यांनी गोमातेला चारा दिला आणि पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद माणिकचंद दुगड, प्रवीण दुगड, प्रकाश दुगड, कीर्ती दुगड, गौरव दुगड, मोनल दुगड आणि दुगड परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी धार्मिक, सामाजिक व उद्योजक क्षेत्रातील मान्यवर, राजस्थानी समाजबांधव तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

See also  वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ - आमदार हेमंत रासने