मुळशी तालुका शेतकरी संघाच्यावतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी,ट्रॅक्टर मोर्चा

पौड : मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टरने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील पिकांची भयाण परिस्थिती भयाणक असून शासनाने सहानभुती दाखवावी आशी मागणी करण्यात आली.

तालुक्यात पावसाने दोन महिन्यापासून ओढ दिली आहे. भात रोपे, सोयाबीन पूर्ण वाळून गेले आहे. जनावरांना चारा टंचाई निर्माण होणार आहे. शासनाने शेजारील भोर, राजगड तालुका दुष्काळग्रस्त जाहिर केला. त्याप्रमाणेच मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी मागणी तहसीलदार विनायक चौबे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी पौड एसटी स्थानक ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, सभापती मंदा शेळके, उपसभापती दगडू करंजावणे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे,  माजी सभापती महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्य राहूल पवळे, शिवसेनेचे प्रकाश भेगडे, सचिन खैरे, आबासाहेब शेळके, संघाचे पदाधिकारी राम गायकवाड,  भाऊ केदारी, लक्ष्मण निकटे, संतोष साठे, दत्ता उभे, दत्तात्रय मारणे, विठ्ठल गुजर, तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे शहर पोलिस मुख्यालयातील सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रुमला भेट