पुणे / नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) भारतीय टेलिकॉम एम्प्लॉईज युनियन (BTEUBSNL) या राष्ट्रीय स्तरावरील कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत पुणे आणि राजस्थान येथील दोन तरुण ज्युनियर इंजिनिअर्सची ‘केंद्रीय संघटन सचिव’ (Organising Secretary) म्हणून निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या केंद्रीय मुख्यालयाकडून संघटनेच्या विस्तार आणि बळकटीकरणाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या संघटनात्मक बदलांतर्गत महाराष्ट्रातून गणेश दिगंबर तिखे, ज्युनियर इंजिनिअर, पुणे बिझनेस एरिया, महाराष्ट्र सर्कल आणि राजस्थानमधून साहिल गोयल, ज्युनियर इंजिनिअर, श्रीगंगानगर बिझनेस एरिया, राजस्थान सर्कल यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र BSNL कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली येथील मुख्य महाव्यवस्थापक (SR) यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. तसेच कॉर्पोरेट नियमांनुसार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आवश्यक ट्रेड युनियन सवलती व सुविधा लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल BSNL कर्मचारी वर्ग, विविध सर्कलमधील संघटनेचे पदाधिकारी आणि मित्रपरिवाराकडून गणेश तिखे व साहिल गोयल यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कामाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
















