पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत पुणे पदवीधर मतदार संघ : ६२.७६ टक्के, पुणे शिक्षक मतदार संघ : ८५.८६ टक्के मतदान

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागातील ०३-पुणे विभाग पदवीधर व ०३-पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ साठी आज दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी  शांततेत मतदान पार पडले. याचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मान्यतेने सहा. निवडणूक निर्णय अधिकारी (तुषार ठोंबरे) यांनी जाहीर केला आहे.

१) पुणे विभाग शिक्षक मतदार संघ – ८५.८६% मतदान
या मतदार संघात एकूण ५ जिल्ह्यांमध्ये ६१,९४० मतदार होते. त्यापैकी ५३,१८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण टक्केवारी ८५.८६% आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी:
पुणे: एकूण मतदार १६,८२२ – मतदान १३,१३४ (७८.०८%)
सोलापूर: एकूण मतदार १५,३०३ – मतदान १३,६१९ (८९.००%)
सातारा: एकूण मतदार ९,४५४ – मतदान ८,४५१ (८९.३९%) – सर्वाधिक टक्केवारी
सांगली: एकूण मतदार ८,०६२ – मतदान ७,०८१ (८७.८३%)
कोल्हापूर: एकूण मतदार १२,२९९ – मतदान १०,८९९ (८८.६२%)

पुरुष मतदारांचा टक्का ८७.९५% तर महिला मतदारांचा टक्का ८२.६२% राहिला.

२) पुणे विभाग पदवीधर मतदार संघ – ६२.७६% मतदान
या मतदार संघात एकूण ३,८८,०१९ मतदार होते. त्यापैकी २,४३,५२१ मतदारांनी मतदान केले असून एकूण टक्केवारी ६२.७६% आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी:
पुणे: एकूण मतदार ८८,२०२ – मतदान ५४,२२२ (६१.४७%)
सोलापूर: एकूण मतदार ४९,७२२ – मतदान ३५,५१५ (७१.४३%) – सर्वाधिक टक्केवारी
सातारा: एकूण मतदार ४७,४६३ – मतदान ३१,७७३ (६६.९४%)
सांगली: एकूण मतदार ८८,०७० – मतदान ४८,८८७ (५५.५१%)
कोल्हापूर: एकूण मतदार १,१४,५६२ – मतदान ७३,१२४ (६३.८३%)

दोन्ही मतदारसंघात पुरुष मतदारांची टक्केवारी महिला मतदारांपेक्षा अधिक राहिली आहे. दोन्ही निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले असून आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती; नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन