कार्यसिध्दीचा वृक्षारोपण संकल्प

पुणे – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  ‘संकल्प वृक्षारोपणाचा बालकांच्या भविष्याचा’ या संकल्पनेतून कार्यसिद्धी प्रतिष्ठानने कात्रज येथील सावंत विहार सोसायटी परिसरात वृक्षारोपण केले.
                              ‌

उन्हाळा संपत असतानाच पावसाची चाहूल लागते आणि वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. गेली अनेक वर्षे मोठ्याप्रमाणात  वृक्षारोपण होते परंतू संगोपन व वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष होते. परिणामी वृक्षारोपण केवळ फार्स ठरतो. यावर्षीच्या उच्चांकी तापमानाने एक संकेत दिला आहे तो ओळखून वेळीच जागे झाले पाहिजे. वृक्षारोपण करून पर्यावरणाकडे पाठ फिरवण्यापेक्षा वृक्षारोपण, संगोपन आणि वृक्षसंवर्धन करणे हि काळाची गरज आहे या पार्श्वभूमीवर कार्यसिद्धी प्रतिष्ठानने ‘संकल्प वृक्षारोपणाचा, बालकांच्या भविष्याचा’ या संकल्पनेतून अभिनव वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला आहे. कात्रज येथे या वृक्षारोपणास सुरूवात केली आहे. सावंत विहार सोसायटी समुहात रस्त्यांच्या दुतर्फा हे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कार्यसिद्धी प्रतिष्ठान चे संस्थापक गिरीराज सावंत, तसेच सावंत विहार परिसरातील, दिलीप जगताप, संजय तात्या शिंदे, अरुण हांडे, प्रवीण वाखारकर, रघुनाथ कड, दत्ता कड, नाना अलेकरी, विलास सोंडकर, रमाकांत नातू, देविदास शिंदे, चौगुले सर, जनार्दन भाटे, अभिषेक चौधरी, थोरात गुरुजी, पंढरीनाथ खोपडे, दिलीप क्षीरसागर, भरत शिंदे,  शिळीमकर सर, विशाल कड, रियाज मुलाणी, अनंत राजे शिर्के, कुमार पाटील, अनिकेत हिप्परगीकर.  चद्रकांत सोनावणे, उत्तमराव मांढरे, अतिश जाधव, गौरव जगताप, कुमार पाटील, सागर खुटवड, मंगेश भोसले, अमर देशमुख, ज्ञानेश्वर इंगळे, बालाजी उजवणकर उपस्थित होते.

See also  बाणेर येथे रूफ टॉप हॉटेल व अनाधिकृत बांधकामावर कारवाई