बाणेर येथे मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत; रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांचा सहभाग

बाणेर : केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ५१ हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला, तर आयोजित रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून माणुसकीचा संदेश दिला.

दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने जमा करण्यात आलेल्या ५१ हजार रुपयांच्या मदत निधीचा धनादेश प्रभाकर ऊर्फ बाबूअण्णा मोहोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

तसेच गणेश कळमकर सोशल फाउंडेशन आणि श्रीनाथ प्रतिष्ठान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण १०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जनसेवा रक्तपेढीच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

या वेळी प्रभाकर ऊर्फ बाबूअण्णा मोहोळ, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, स्मृती जैन, मोसमी बकोरे, विजयाताई चांदोरे, पांडुरंग भुजबळ सर आणि जगदीश कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या मदतनिधी आणि रक्तदान या दोन्ही उपक्रमांतून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित झाली. उत्सवाला समाजसेवेची जोड देत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

See also  ८० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा आनंदवन हास्य परिवाराकडून बाणेर येथे गौरव