जैन धर्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्मापैकी एक आहे-विठ्ठल साठे.


पुणे :’ जैन धर्म हा जगातील सर्वांत श्रेष्ठ धर्म आहे. जैन धर्मातील पाच तत्त्वे जगाच्या शांततेसाठी निर्माण झाली आहेत. सत्य, अहिंसा , अपरिग्रह, अचौर्य आणि ब्रम्हचर्य ही ती पाच तत्त्वे आहेत. जग एका भयानक अशांततेमुळे ग्रासलेले आहे. ही अशांतता जगातून नष्ट करायची असेल तर जगाला जैन परंपरेतील तत्त्वांचा स्वीकार करावा लागेल. ‘ असे प्रतिपादन जैन विचार मंचचे निमंत्रक श्री विठ्ठल साठे यांनी केले.

जैन विचार मंचच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जैन धर्माची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यासाठी स्वतः ला झोकून दिले पाहिजे.
जैन विचार मंच जैन धर्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी कार्यरत असलेला मंच आहे. या मंचाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे जैन असलेले परंतु सध्या ते प्रवाहापासून दूर गेले आहेत. अशा लोकांना स्थितीकरण करून पुन्हा जैन केले जाते. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लोकांना मुक्त केले जाते. पूर्णपणे शाकाहारी बनवले जाते. आतापर्यंत या मंचाने २५० परिवारांना जैन प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे.

या बैठकीसाठी जैन विचार मंचचे सचिव श्री शंकर वाघमारे सदस्य श्री राजेंद्र भोंडवे श्री. पांडुरंग दुबळे, श्री राजेंद्र अडागळे, श्री सनी भोंडवे श्री सनी अवघडे श्री समीर डोलारे, श्री दत्ता महापुरे, श्री दत्ता भोंडवे, श्री . संतोष भोंडवे उपस्थित होते. सदर बैठक गुजरात काॅलनी येथे आयोजित करण्यात आली होती.आभार प्रदर्शन जैन विचार मंचचे सचिव श्री. शंकर वाघमारे यांनी केले.

See also  आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख