पुणे : अनाधिकृतपणे खोदकाम केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेने बाणेर येथील मे मॅन्डरिन कन्स्ट्रक्शनला आकारलेला दंड 62 लाख 54 हजार 496 रुपये त्वरित वसूल करावा अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे रविराज काळे यांनी केली
बाणेर येथील सर्वे नं 33 या ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल 171 मी टाकण्यात आली होती.पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असे आदेश काढले होते की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी पावसाळ्यात आणि विनापरवाना रस्ते खोदाई करून कोणतेही काम केले जाणार नाही असे पालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्ट आदेश असताना देखील बाणेर येथील बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केल्यामुळे त्यास आकारलेला 62,54,496₹ दंडाची नोटीस 12/07/2023 रोजी पाठवण्यात आली होती.
तो दंड आज एक महिना उलटून गेला तरी बांधकाम व्यावसायिकाने दंड मनपा कोषागारात भरला नाही तरी आपण त्या बांधकाम व्यावसायिकास पुन्हा एकदा नोटीस देऊन दंड व्याजासहित वसूल करावा.अन्यथा न्यायालयाचा मार्ग अवलंबवू असा इशारा रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी दिला.