पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुकुंदनगर येथे संपन्न झाला.

देशातील जुलमी राजवट संपवून लोकशाही जपण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एक दिलाने काम करत महाविकास आघाडीचा पुणे लोकसभेत विजय घडवून आणावा, असे आवाहन यावेळी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने करण्यात आले. पुणेकरांसमोर असणाऱ्या महागाई, बेरोजगारी व वाहतुक कोंडी यांसह देशात संविधानविरोधी कारवाई करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला.


या बैठकी प्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमुख गजानन हरगुडे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड,संजय बालगुडे,स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, मा.नगरसेवक अशोक हरणावळ आदींसह  पदाधिकारी उपस्थित होते.

See also  अनिस सुंडके यांना एमआयएम ची उमेदवारी