बुद्धरूप व महामानवाची प्रतिकृती देऊन बुद्ध पौर्णिमा साजरी

पुणे : माजी नगरसेवक आनंद छाजेड व यांच्यावतीने वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त बोपोडी व औंध प्रभागातील ५०० नागरिकांना तथागत भगवान गौतम बुद्धांचे बुद्ध रूप आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा देऊन बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.


याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस सुनील माने, माजी स्वीकृत सदस्य बाळासाहेब रानवडे, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या लक्ष्मीदीदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आनंद छाजेड यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. सपना छाजेड यांनी बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या लक्ष्मी दीदी यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर माहिती देत बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सुनील माने, डॉ. संजय चाकणे यांनीही मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे व प्रल्हाद झरांडे यांनी केले तर बुद्ध वंदना बौद्धाचार्य उमेश कांबळे गुरुजी यांनी घेतली.
संकेत कांबळे व मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे लहान मुलांसाठी मनोरंजन नगरी, बाल जत्रा व सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.

See also  'जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख