बालेवाडी भागाला २४x७ समान पाणी पुरवठा सुरू करण्यासंदर्भामध्ये पाहणी, १५ दिवसात कामे पूर्ण होणार

बालेवाडी : बालेवाडी भागाला २४x७ समान पाणी पुरवठा सुरू करण्यासंदर्भामध्ये पाहणी करण्यात आली. अंतिम टप्प्यात असलेले पाईप लाईनचे काम येत्या दहा ते पंधरा दिवसात पूर्ण होऊन २४बाय७ बालेवाडी परिसरात पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पाषाण-बावधन हद्दीलगत असणार्या रामनगर येथे (HEMRL जवळ) रामनदीवरील अत्यंत महत्वाच्या ट्रान्समिशन वॅाटर लाईन कॅरेजवे चे काम काल रात्री पुर्ण करण्यात आले. यावेळी उपस्थित राहुन मनपा अधिकार्यांसमवेत या कामाची पाहणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली.

पुढील १० दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यात बालेवाडी भागाला या योजने अंतर्गत समान पाणी पुरवठा सुरु होणार आहे. संपुर्ण पुणे शहरात २४ x ७ योजने अंतर्गत बालेवाडी भागाला सर्वात प्रथम पाणी पुरवठा होत आहे.

पहिल्या फेज मध्ये बालेवाडी भागाला पाणी पुरवठा सुरु केला जाईल व दुसर्या फेज मध्ये बाणेर भागाला एक महिन्याच्या अंतरामध्ये पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.

हे २४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच हे काम कमी वेळेत पुर्ण करण्याकरीता कार्यकारी अभियंता श्री.अनिरुद्ध पावसकर साहेब, श्री.जगताप साहेब, श्री.क्षिरसागर साहेब, श्री.बनकर साहेब, श्री.शिंदे साहेब हे अधिकारी कायमच प्रयत्नशील आहेत.

बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील पाणी प्रश्न कायमचा मिटण्याकरीता तसेच बाणेर-बालेवाडी भाग टॅंकरमुक्त होण्या याकरीता या योजने अंतर्गत पाणी पुरवठा होणे अत्यंत महत्वाचे आहे. या योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याकरीता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे मनपा आयुक्त, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याकडे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर यांनी वारंवार पाठपुरावा केला.

यावेळी माझ्यासमवेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अनिरुद्ध पावसकर , श्री.जगताप, श्री.क्षिरसागर , श्री.बनकर , श्री.शिंदे साहेब उपस्थित होते.

See also  सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारकविभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश