शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करा
-केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

सातारा : शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, अशा सूचना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. मिश्रा यांनी आज जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्व विभाग त्यांच्या योजना चांगल्याप्रकारे राबवित असल्याचे सांगून श्री. मिश्रा पुढे म्हणाले, आणखी चांगले काम करावे, यासाठी सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे. योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्याने काम करावे.

यावेळी श्री. मिश्रा यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामसडक योजना, आरोग्य विभागाशी व महिला बालकल्याण विभागाशी संबंधित विविध योजना यांचा सविस्तर आढावा घेतला.

See also  मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे